Ad will apear here
Next
मानसिक आजार जाणून घेण्यासाठी...


एखादा माणूस कुलूप लावून झाल्यावर ते कुलूप पुन्हा पुन्हा ओढून बघतो. काही जण देवाच्या फोटोला एकदा नमस्कार करून झाल्यावर पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. एखादी आई बाळाला आंघोळ घालत असते आणि तिच्या मनात येतं, ‘मी हे बाळ पाण्यात बुडवलं तर.’ कोणाला वाटतं, की काही जण मला ठार मारण्यासाठी रस्त्यात टपून बसले आहेत. 

कोणत्या माणसाच्या मनात काय विचार येतील हे कधीच सांगता येत नाही. काही वेळा विचार सामान्य असतात, तर काही वेळा त्या माणसाला स्वतःला आणि आसपासच्या लोकांना त्रासदायक ठरतात. जेव्हा एखादा माणूस असामान्य विचार करू लागतो किंवा वागतो, तेव्हा त्याला वेड लागलं असं सामान्यपणे म्हटलं जातं. काही वेळा त्याला बाहेरची बाधा झाली आहे असंही मानतात; पण असे विचार किंवा वागणं हा एक मानसिक आजार असू शकतो. जसं शरीराला आजारपण येतं तसं मनालाही आजारपण येतं.

मनाचे असे कोणते आजार असू शकतात आणि त्यावर काय उपाय केले जातात, ह्यावर डॉक्टर श्रीकांत जोशी ह्यांनी लिहिलेलं ‘मनोविकारांचा मागोवा’ हे पुस्तक म्हणूनच संग्रही ठेवण्यासारखं आहे. ह्या पुस्तकात अत्यंत सोप्या शब्दात अनेक उदाहरणं देऊन चिंता, फोबिया, मंत्रचळ, हिस्टेरिआ, डिप्रेशन, डिल्युजन डिसॉर्डर्स, स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया असे आजार समजावून सांगितले आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘मनोविकारतज्ज्ञाकडे फक्त वेड लागलेले लोक जातात’ हा भ्रम ह्या पुस्तकातून दूर होतो. 

बऱ्याच वेळा कुटुंबातील व्यक्तीकडून ‘तुम्हाला काही झालेलं नाही, हे मनाचंच आहे’ अशी समजूत घातली जाते; पण जेव्हा मनातील विचार असामान्य असतात, वागणं असामान्य असतं तेव्हा मनोविकारतज्ज्ञाकडे जावं, हे ह्या पुस्तकातून लक्षात येतं.

सुदैवाने, मागील दहा-पंधरा वर्षांत मानसिक विकारांबद्दल समाजामध्ये असलेले गैरसमज दूर होताना दिसत आहेत. तरीही अजून बरंच काही समजून घ्यायचं आहे. आधुनिक जीवनशैलीने ताणतणाव आणले आणि त्यातून मनोविकार फैलावत चालले आहेत. हे मनोविकार कोणते असतात, त्यांची सुरुवात कशी होते, त्यातून कोणत्या समस्या उभ्या राहतात आणि त्यावर काय उपाय आहेत हे ह्या पुस्तकातून समजावून सांगितलं आहे. 

ह्या मनोविकारांना अटकाव करणारी नवीन औषधंही निर्माण होत आहेत. काही गंभीर मानसिक आजारही आता गोळ्यांनी आणि समुपदेशन करून बरे होतात. प्रत्येक व्यक्तीला शरीर आहे आणि शरीराचे आजारही आहेत. तसंच प्रत्येक व्यक्तीला मन आहे आणि मनाचे आजारही होऊ शकतात. हे आजार कसे असतात, त्यांची लक्षणं कोणती असतात हे समजून घेण्यासाठी ‘मनोविकारांचा मागोवा’ हे पुस्तक जरूर वाचायला हवं, आपल्या संग्रही ठेवायला हवं.

- निरेन आपटे


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WVEKCU
Similar Posts
लंडनच्या आजीबाई ‘बेळगाव, निपाणी, कारवार आणि लंडनसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे अशी घोषणा आता द्यायला हरकत नाही,’ असे आचार्य अत्रे ह्यांनी एकदा गमतीने म्हटले होते.
रहस्यमय त्रिकोणाचा मागोवा अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस असलेला हा सागरी प्रदेश अनेक वर्षांपासून एक गूढ बनून राहिला आहे. विजय देवधरांनी अनुवाद केलेल्या बर्म्युडा ट्रँगल पुस्तकात ह्या गूढ सागराचा वेध घेतला आहे. हा भाग सैतानाचा आहे इथपासून ते परग्रहावरील मानव इथून विमाने-जहाजे पळवतात इथपर्यंतच्या शक्यतांची माहिती दिली आहे. पुस्तकाचा
डबिंगच्या गमतीजमती आमची रिहर्सल चालली होती; पण अमिताभ ‘च’चा उच्चार हिंदी ‘च’सारखा करत होते. मग मी मराठी ‘च’ म्हणून दाखवत होतो आणि ते फॉलो करत होते. शेवटी अचानक थांबले आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘लोणचं’वाला ‘च’ बोलना हैं क्या?’ मी स्तंभित झालो. त्यांना लोणचं शब्द माहीत होता!! मी होकार दिल्यावर त्यांनी मराठी ‘च’चा अचूक
शेवटचे स्टेशन कुडाळ!! आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो तेव्हा अनेक स्टेशनांची अनाउन्समेंट ऐकू येते आणि शेवटी आपले स्टेशन येते. अनेक स्टेशन्स पालथी घातल्यावर आपले मुक्कामी स्टेशन येते. इथे विसावा असतो. कल्याण सोडून असा विसावा कुडाळमध्ये घ्यावा असे मला वारंवार वाटत आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language